हॉटेल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.
देवाने कोकणला दिलेली मोठी देणगी म्हणजे ''निसर्ग".
अशा या निसर्गरम्य कोकणात पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त राहण्याची व जेवणाची उत्कृष्ट सोय असलेले गुहागर तालुक्यातील एकमेव नावाजलेले हॉटेल म्हणजे "हॉटेल हेमंत".
हॉटेल संदर्भात थोडक्यात: गुहागर तालुक्यातील शृंगारतळी गावातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व कै. यशवंत महादेव संसारे यांनी सन १९८५ साली हॉटेल व्यवसायाची सुरुवात हॉटेल हेमंत या नावाने केली आणि या व्यवसायात त्यांच्या पत्नी श्रीमती सुनिता संसारे यांनी हातभार लावत व्यवसायात उभारी देण्याचे काम केले.
१९८५ साली कै. यशवंत संसारे यांनी लावलेल्या छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे आणि याचे श्रेय श्री. ओंकार यशवंत संसारे यांना द्यावे लागेल कारण दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण करत वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी व्यवसायात पदार्पण करून हॉटेल हेमंत ची धुरा आपल्या हातात घेतली आणि नवनविन सुधारणा करत आज हे हॉटेल पूर्ण गुहागर तालुक्यात नावलौकिकास आणून ठेवले आहे आणि श्री. ओंकार संसारे यांच्या पत्नी सौ. रुची संसारे या आपल्या पतीला व्यवसायात साथ देत आहेत.